पारदर्शक प्रशासनासाठी दस्तऐवजावर क्यू आर कोड आणि युनिक आयडी,जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. 19 : जिल्हा प्रशासनाने सुशासन सप्ताह अभियानांतर्गत विकसित केलेली दस्तऐवज पडताळणी (Document Verification) सुविधा ही एक सुरक्षित व तंत्रज्ञानाधारित प्रणाली आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला आहे.

या प्रणालीमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी User ID व Password आधारित सुरक्षित लॉगिनची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित शासकीय अधिकारी लॉगिन करून निर्गमित होणाऱ्या दस्तऐवजांना युनिक आयडी (Unique ID) व QR कोड मॅप करतात. हा युनिक आयडी व QR कोड त्या दस्तऐवजाची ओळख व सत्यता सुनिश्चित करतो.

नागरिक तसेच इतर शासकीय कार्यालये https://verify.dmcsn.com/ या पोर्टलवर दस्तऐवजावरील QR कोड स्कॅन करून किंवा युनिक आयडी प्रविष्ट करून संबंधित दस्तऐवजाची त्वरित पडताळणी करू शकतात. यामुळे तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातून निर्गमित होणाऱ्या विविध आदेश, प्रमाणपत्रे व इतर शासकीय दस्तऐवजांची खात्रीशीर तपासणी सुलभ होते.

ही सुविधा नागरिक व शासकीय कार्यालयांना वेळेत व अचूक दस्तऐवज पडताळणी करण्यास मदत करते. बनावट, फेरफार केलेले किंवा संपादित (Editable) दस्तऐवज ओळखून त्यापासून होणारे गैरप्रकार, फसवणूक व पुढील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरत असून, प्रशासनातील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन अंतर्गत होणाऱ्या महसूल आणि इतर विभागाअंतर्गत होणारा पत्रव्यवहार तसेच यातून विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे नागरिकांना वितरित केले जातात हे वितरित करत असताना त्याचे प्रमाणिकीकरण ओळखण्यासाठी क्यू आर कोड द्वारे वेगळी ओळख कायमस्वरूपी देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना हे कागदपत्र कोठेही आणि कधीही संबंधित कागदपत्राचा क्यू आर कोड स्कॅन करून पाहता येणार आहे.

ही सुविधा निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली असून, याचे डिझाइन व विकास प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या