४ वर्षांच्या चिमुकल्यांचा समुद्रात पराक्रम, फ्लिपर्स स्वीम क्लबचे मालवण समुद्र जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मालवण : दि. १३ व १४ डिसेंबर रोजी मालवण येथे पार पडलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय समुद्र जलतरण स्पर्धेत कर्मवीर जलतरण तलावातील फ्लिपर्स स्वीम क्लबच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत राज्यभर लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेत अवघ्या ४ वर्षांपासून पुढील वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विशेष बाब म्हणजे या चिमुकल्या खेळाडूंनी ५०० मीटरपासून थेट १० किलोमीटरपर्यंत खडतर समुद्र प्रवाहात यशस्वी जलतरण पूर्ण करत आपली क्षमता सिद्ध केली.

उंच लाटा, जोरदार समुद्री प्रवाह आणि आव्हानात्मक वातावरणातही खेळाडूंनी दाखवलेले धैर्य, आत्मविश्वास व तांत्रिक कौशल्य कौतुकास्पद ठरले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे हे यशस्वी फलित असल्याचे मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.

यशस्वी खेळाडू :

हृदयांश डोईफोडे (वय ४) – ५०० मीटर

एकांश भोसले (वय ४) – ५०० मीटर

शिवराज बारबोले (वय ९) – १ किलोमीटर

दर्शन चव्हाण (वय ९) – १ किलोमीटर

तन्वी नवले (वय ९) – १ व १० किलोमीटर

शौर्य नवले (वय १०) – २ व १० किलोमीटर

जान्हवी वास्कर – ३ व १० किलोमीटर

माधव शिंदे – ३ व १० किलोमीटर

जयसिंह शिंदे – ३ व १० किलोमीटर

रुद्र नवले – १० किलोमीटर

मार्गदर्शन :

बाळराजे पिंगळे (कोच)

या यशाबद्दल पालक, प्रशिक्षक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या