बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुविधा विकास महामंडळ मर्यादित विभाग अंतर्गत ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित विभाग अंतर्गत ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर झाला आहे. बार्शी तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आमदार राजेंद्र राऊत यांनी मंजूर केला आहे,याचाच एक भाग म्हणून श्री भगवंताचे बार्शी ते धाराशिव जिल्ह्यातील आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर तिर्थक्षेत्र जोडणाऱ्या बार्शी ते तुळजापूर रस्ता सुधारणा करण्यासाठी ३४६ कोटी ७१ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.

बार्शी येथे जगातील एकमेव मंदिर आणि बार्शीचे ग्रामदैवत अंबरीष वरद श्री भगवंत मंदिर असुन या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे.बार्शी येथुन कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने लाखो भावीक तुळजापूरला आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जातात.ही दोन्ही तिर्थक्षेत्रे जोडणाऱ्या बार्शी ते तुळजापूर रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने भाविक,पर्यटकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांची मोठी गैरसोय होत होती,या रस्त्याच्या कामामुळे बार्शी,शेलगाव,महागाव,मळेगाव, जामगाव पा,उपळे दुमाला,गौडगाव,संगमनेर,तुळजापूर आदी गावासह परीसरातील नागरीकांची सोय होणार आहे.

सदर रस्ता हा सोलापूर व धाराशीव दोन जिल्हयातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे, किमी ५/८०० ते किमी ४२/६०० ही लांबी बार्शी तालुक्यातील असून किमी ४२/६०० ते ५२/००० हि लांबी तुळजापूर तालुक्यातील आहे. या रस्त्यावर बार्शी, तुळजापूर, इ. महत्वाची धार्मिक,पर्यटन व ऐतिहासिक क्षेत्राशी संबधित गावे आहेत,सदर रस्त्याची रुंदी १०.०० मीटर असून दोन्ही बाजूस १.०० मीटर रुंदीची बाजू पट्टी होणार आहे.या रस्त्याची निवीदा प्रसिद्ध झाली असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे बार्शी तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या