जागतिक महिला दिनानिमित्त त्यागमुर्ती माता रमाई फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांचा सन्मान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जागतिक महिला दिनानिमित्त त्यागमुर्ती माता रमाई फाउंडेशनच्या वतीने वडगाव आनंद येथील बुद्ध‌विहारात महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्र‌माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच त्यागमुर्ती माता रमाई याच्या प्रतिमापूजन करण्यात आले.

या कार्यक्रमानिमित्त त्यागमूर्ती माता रमाई फाऊडेशनच्या वतीने ‘विधवा महिलांचा सन्मान’ कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गावातील विधवा स्रीयांना सामाजिक जीवनात असणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्यागमूर्ती माता रमाई फाऊंडेशन सतत प्रयत्नशील राहील असे सांगण्यात आले. स्त्रीयांना मानपान देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात देण्यात आल्या. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला ग्रामस्थांसह त्यागमूर्ती माता रमाई फांऊडेशन संपूर्ण कार्यकारीणी उपस्थित होती. यावेळी हिराबाई काशिकेदार, रंजना काशिकेदार, रुक्मिणी लोखंडे, आशा काशिकेदार, मंगल काशिकेदार, सविता काशिकेदार, नंदा देविदास आल्हाट, सुनिता भाऊ घोडेकर, ॲड.अनुराधा काशिकेदार, गायत्री काशिकेदार, वर्षा काशिकेदार, पूजा अमर लोखंडे, वैशाली लोखंडे, आरती देठे, इ. महिलांनी ‘जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला.

या कार्यक्रमादरम्यान निशा वाळुंज ग्रामपंचायत सदस्या, डी. बी. वाळुंज सामाजिक कार्यकर्ते, संदेश काशिकेदर उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद तर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्य़ातील, जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी व वडगाव आनंद च्या महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना काशिकेदार यांनी केले तर आभार आशा काशिकेदार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या