समाज मंदिराच्या दुरुस्तीची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : सिद्धार्थनगर मधील अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आलेले समाज मंदिर मोडकळीस आले असून त्याची त्वरीत दुरुस्ती करावी याबाबतचे निवेदन डॉ .बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने वैराग नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील यांना देण्यात आले.
वैराग ग्रामपंचायत असताना पूर्वीच्या काळी बांधण्यात आलेले समाज मंदिर सुमारे दहा वर्षापासून मोडकळीस आलेले आहे. त्यावरील पत्रे उडून गेले आहेत .पावसाचे पाणी आतमध्ये येऊन माळवद खाली ढासळत आहे. समाज मंदिर परिसरात वयोवृद्ध , ज्येष्ठ नागरिक बसतात , लहान मुले खेळत असतात. दरम्यान मोडकळीस आलेल्या समाज मंदिराची भिंत ढासळून अपघात झाल्यास मोठा अनर्थ निर्माण होईल .तरी सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून प्रशासनाने त्वरीत समाज मंदिर दुरुस्त करून द्यावे.
अन्यथा 26 जानेवारी2026 रोजी नगरपंचायतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. या बाबतचे निवेदन नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील यांना सोमवारी 15 डिसेंबर रोजी देण्यात आले. यावेळी नगर अभियंता रामभाऊ जाधव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.




