बार्शी नगरपरिषद क्षेत्रातील भगवंत मंदिराजवळ भक्त निवास बांधकाम करणे यासाठी ”नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजतेअंतर्गत ९ कोटी निधी मंजूर : आमदार राजेंद्र राऊत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण भारतात व बार्शी शहर व तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले, प्रसिध्द, प्राचीन कालीन मंदीर व भारतातील एकमेव भगवंताचे मंदीर म्हणुन सर्वदूर परिचित असलेले बार्शी शहराचे ग्रामदैवत भगवंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भक्त निवास बांधण्यासाठी ”नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजतेअंतर्गत ९ कोटी निधी मंजूर झाला आहे.

बार्शी शहर, तालुका तसेच महाराष्ट्रातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या भगवंताच्या भाविक भक्तांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने ९ कोटी मंजूर केले आहेत.सदर भक्त निवास पुर्ण झाल्यावर भाविकांचीही राहण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून शिंदे-फडणवीस-पवार सरकार कामगीरी दमदार अशी प्रतिक्रिया सर्व स्थरातील जनतेतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या