वैराग ग्रामीण रुग्णालयासाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी – आमदार दिलीप सोपल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वैराग बार्शी येथील 30 खाटां चे ग्रामीण रुग्णालय बांधकाम करणे या सार्वजनिक प्रयोजनासाठी आगाऊ ताब्याने प्रदान करण्यात आलेली शासकीय गट नंबर 422 क्षेत्र चार हेक्टर 45 आर पैकी दोन हेक्टर 45 आर जमीन प्रदान करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहे

याबाबत बोलताना सोपल म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून या संदर्भाने व्यक्तिगत व सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून व मी शासन दरबारी प्रयत्नशील होतो याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे या सर्वांची मदत मिळाली.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने 8 डिसेंबर 2025 रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासन आदेशामध्ये यासंदर्भातील आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने वैराग येथील शासकीय गट नंबर 422 /2 एकूण क्षेत्र चार हेक्टर 45 आर पैकी दोन हेक्टर 45 जमीन मौजे वैराग येथील 30 खाटांचे रुग्णालय बांधकाम करणे या सार्वजनिक प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 40 व महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे महसूल वन विभिनियम 1971 मधील नियम पाच-सहा मधील तरतुदीनुसार तसेच प्रस्तुत येथील 30 घाटांचे रुग्णालय बांधकाम करणे या सार्वजनिक प्रयोजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 40 व महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे महसूल वन विनियमन 1971 मधील नियम पाच-सहा मधील तरतुदीनुसार तसेच प्रस्तुत जागेवरचे बगीचा आरक्षणामध्ये बदल करून ग्रामीण रुग्णालय या प्रयोजना करता नगरपरिषद वैराग यांनी नगर विकास विभागाचे मान्यता घेण्याच्या अटीस अधीन राहून जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांना महसूल मुक्त भोगवटा मूल्यविरहित किमतीने कब्जा हक्काने प्रदान करण्यास कार्योत्तर मंजुरी देण्यात आलेली आहे.

आमदार सोपल पुढे म्हणाले की ,यासंदर्भाने लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन याविषयी तातडीने पावले उचलल्या संदर्भात आग्रही असणार असून हे ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर व्हावे या दृष्टीने आम्ही शासन स्तरावर प्रयत्नशील आहोत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या