सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजनेचा सन 2025-26 मध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यात येते. याशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून 25 ते 30 टक्के पूरक अनुदान, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून 10 ते 15 टक्के पूरक अनुदान मिळून एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते.

अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे:

अर्जासाठी संकेतस्थळ: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin

अर्ज करताना माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रे: ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचा दाखला.

योजनेचा लाभ ५ हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे.

अर्ज “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर स्वीकारले जातील.

संगणकीय सोडतीनंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना SMS द्वारे कळविण्यात येईल.

अनुदान प्रक्रिया:
पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर उप कृषि अधिकारी यांच्यामार्फत मोका तपासणी होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधारलिंक बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.

आवाहन :
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा सामुहिक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या