आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना यश बार्शी तालुक्यातील शेळगाव(आर) येथील जुन्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करणे यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून ४ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शेळगाव (आर) येथील जुन्या पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडे सतत पाठपुरावा केला होता,त्यांच्या पाठपुराव्यामुळे ४ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या साठवण तलाव निर्मितीमुळे हजारो एकर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार असून, या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे येथील शेतकरी सधन व आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल,अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
बार्शी तालुक्यासाठी मिळालेल्या या निधीबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार व्यक्त केले.