वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत बार्शी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींना २ कोटींचा निधी मंजूर…

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२३-२४ करिता बार्शी तालुक्यातील २३ ग्रामपंचायती अंतर्गत विकासकामांना एकूण २ कोटी निधी मंजूर झाला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राज्यात भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गात अनेक जाती जमाती अजून आज त्या भटकंती करून स्थलांतरित जीवन जगत आहेत. लमान, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहाचे तांडे व वस्त्या आहेत. अशा तांड्यांत या जाती, जमातीतील नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असले तरी अशा तांडे व वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.यातच आधुनिकतेकडे कल असला तरी बहुसंख्य तांडे,वाडी किंवा वस्त्यांत या समाजाला स्थिर जीवन जगता यावे यासाठी तेथील नागरिकांना सुविधेसाठी शासनाने निधीची तरतूद उपलब्ध करून दिली.योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत मान्यतेतील कामांच्या शिफारशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता याची दखल घेत निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील धनगर वस्ती येथे अंतर्गत पाईपलाईन, बंदीस्त गटार,काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख,खडकलगाव येथील कवडे गल्ली येथे जोडरस्ता करणे यासाठी ४ लाख, खडकलगाव येथील गोपाळवाडी येथे काँक्रीट रस्ता करणे यासाठी ४ लाख,उंबरगे येथील वंजारी गल्ली येथे काँक्रीट रस्ता करणे यासाठी ६ लाख,काटेगाव येथील वडारवस्ती येथे काँक्रीट रस्ता करणे ६ लाख,खांडवी येथील जोशी वस्ती येथे बंदिस्त गटार करणे ४ लाख,ममदापूर येथील वडारवस्ती येथे काँक्रिट रस्ता व गटार करणे ४ लाख,भातंबरे येथील मदने वस्ती येथे काँक्रिट रस्ता करणे ४ लाख,भातंबरे येथील वाघमोडे वस्ती-२ येथे काँक्रिट रस्ता करणे ४ लाख,देवगांव येथील मारकड वस्ती येथे काँक्रिट रस्ता करणे ४ लाख,देवगांव येथील बेरड वस्ती येथे काँक्रिट रस्ता करणे ४ लाख, गौडगांव येथील गावठाण मध्ये काँक्रिट रस्ता करणे ५ लाख, सावरगाव येथील गावठाण वस्ती येथे काँक्रिट रस्ता व बंदिस्त गटार करणे ७ लाख,काटेगाव येथील अशोक नगर येथे बंदिस्त गटार करणे ४ लाख,कव्हे येथील धनगर गल्ली येथे काँक्रिट रस्ता व गटार करणे १० लाख, चिखर्डे येथील धनगरवस्ती येथे बंदिस्त गटार करणे ४ लाख,जामगाव येथील गडदे वस्ती येथे बंदिस्त गटार करणे ६ लाख,यावली येथील होळकर वस्ती येथे काँक्रिट रस्ता व गटार करणे १० लाख,नारी/नारीवाडी येथील लक्ष्मण महाराज वस्ती येथे काँक्रिट रस्ता करणे ५ लाख,सावरगाव येथील गावठाण (धनगरवस्ती) येथे काँक्रिट रस्ता करणे ३ लाख,धोत्रे येथील तिरमलवस्ती येथे बंदिस्त गटार व अंतर्गत काँक्रिट रस्ता करणे ६ लाख,सुर्डी येथील वडरवस्ती येथे काँक्रिट रस्ता करणे ४ लाख, भालगाव येथील दराडे वस्ती येथे काँक्रिट रस्ता करणे १० लाख, पानगाव येथील धनगर वस्ती क्र.१ येथे काँक्रिट रस्ता व भुमिगत गटार करणे १० लाख,पानगाव येथील धनगर वस्ती क्र.२ येथे काँक्रिट रस्ता व भुमिगत गटार करणे १० लाख,पानगाव येथील वडर वस्ती येथे भुमिगत गटार करणे ४ लाख,पानगाव येथील बेरड वस्ती येथे काँक्रिट रस्ता व भुमिगत गटार करणे ५ लाख,आगळगाव येथील धनगर वस्ती येथे काँक्रिट रस्ता व भुमिगत गटार करणे ४ लाख,तांबेवाडी येथील मधला तांडा येथे काँक्रिट गटार करणे १० लाख,तांबेवाडी येथील येमाई तांडा येथे काँक्रिट रस्ता करणे १० लाख,तांबेवाडी येथील सेवालाल नगर येथे काँक्रिट रस्ता करणे १० लाख,कासारी येथील लमाण तांडा येथे काँक्रिट रस्ता करणे ३ लाख,घोळवेवाडी येथील तांडा वस्ती क्र.१ येथे सिमेंट काँक्रिट रस्ता व गटार करणे २ लाख,भातंबरे येथील वाघमोडे वस्ती क्र.१ येथे काँक्रिट रस्ता करणे ४ लाख इत्यादी कामांसाठी २ कोटी निधी मंजूर झाला आहे.
तांडा वस्त्यांचा अंधार दूर करण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाठपुरावा केल्यानंतर सरकारने भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,bउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले.