जयंतीबार्शी

जिजामाता विद्यामंदिर येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची 121 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : कर्मवीर सप्ताहातील 5 वे पुष्प बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करून गुंफण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून न. पा. शिक्षण मंडळाचे कर्तव्यदक्ष प्रशासन अधिकारी मा. श्री. अनिल बनसोडे तसेच शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. दीपक गुंड व दैनिक पुढारी चे पत्रकार गणेश गोडसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पांडे या होत्या.

प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या शुभहस्ते सन 2022-2023 या वर्षातील प्रथम व द्वितीय क्रमांक तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 121व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या शाळास्तरावरील विविध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींना बक्षीसे देण्यात आली. त्याच प्रमाणे संस्था स्तरावरील घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींना कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या चरित्रविषयक पुस्तके, कंपासपेटी,स्केचपेन, रंगखडूपेटी, कथापुस्तके, इ. प्रकारची बक्षीसे देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे अनिल बनसोडे यांनी सर्वांना अनमोल असे मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली. प्राचार्य मा. डॉ. दीपक गुंड यांनीही अनमोल मार्गदर्शन करून सर्व यशस्वी मुलींचे कौतुक केले. पत्रकार गणेश गोडसे यांनीही सर्वाना मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थीनींचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शृंगारपुरे यांनी केले व बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन चोरमले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button