सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने, त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : माता रमाई, बाबासाहेबांच्या वादळी आयुष्यात न डगमगता सहचारिणी म्हणून उभ्या राहिल्या. वैयक्तिक सुखांचा त्याग करून, प्रसंगी आपली पोटची मुलं गमवल्यावरही त्या खंबीरपणे लढत राहिल्या. समाज हितासाठी हाल अपेष्टा सहन केल्या. त्यांचे स्थान बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण आहे. अश्या त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, अंबादास बाबा करगुळे, देविदास गायकवाड़, शौकत पठाण, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, विद्यार्थी सेल अध्यक्ष नागेश म्याकल, अनिल मस्के, बसवराज म्हेत्रे, युवराज जाधव, वशिष्ठ सोनकांबले, विवेक कन्ना, बंटी चंदनशिवे, लखन गायकवाड़, हारून शेख, हसीब नदाफ, आसिफ इक़बाल, संजय गायकवाड़, सागर उबाळे, जीतू वाडेकर, दीनानाथ शेळके, विवेक इंगळे, हनमंतु सायबोलु, श्रीशैल रणधीरे, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, पृथ्वीराज नरोटे, रज़ाक कादरी शिवाजी सालुंखे, अंजली मंगोडेकर, करिमुनिस्सा बागवान, शिवशंकर अंजनालकर, धीरज खंदारे, शुभांगी लिंगराज, सुमन जाधव, सत्यनारायण संगा, आकाश जांभळे, मोहसिन फुलारी, चंद्रकांत टीक्के, लता सोनकांबले, सुभाष वाघमारे, शुभम माने, अप्पा सलगर, अभिलाष अच्युगटला, हाजी महमूद शेख, श्रीधर वाघमोड़े, पुष्पा तुळसे, श्रीकांत कोंडा, मुमताज मदर शेख, प्रियंका गुंडला, कोंडनताई काकड़े, अंबुबाई शेजवाल, मुमताज तांबोली, सुनीता बेरा, असलम शेख, हेमा कोळी, स्नेहल शिंदे, सलीमा शेख, नंदा कांबले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.