राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष (युवक) पदी अतिश गायकवाड यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : “घड्याळ तेच वेळ नवी”काल सोलापुर येथे मला राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) सोलापुर जिल्हा उपाध्यक्ष (युवक) पदी अतिश गायकवाड यांची नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचारानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली ,राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार मा. दिपकआबा सांळुखे-पाटील मा. संतोष भाऊ पवार जिल्हा कार्याध्यक्ष बाळूमामा बंडगर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष मा.अभिषेक आव्हाड जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड, श्रीकांत शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले पक्षाने मोठ्या विश्वासाने हि जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार मी तळागाळात पोहचवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल.