शेळगाव आर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश सोहळा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील शेळगाव आर येथे आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते ११ कोटी १० लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच शेळगाव आर गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोपल गटाचे जुने निष्ठावंत ज्येष्ठ नेते प्रकाश (बप्पा) गायकवाड यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला,आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला तसेच शुभेच्छा दिल्या.आपण सर्वांना सोबत घेऊन करत असलेल्या विकास कामांमुळे प्रभावीत होऊन अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
शेळगाव आर येथे आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते शेळगांव (आर) येथील जुन्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करणे यासाठी ५ कोटी,जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी,अंतर्गत पाईपलाईन,विहीर करणे यासाठी १ कोटी ९० लाख,धामणगांव-शेळगांव-कौठाळी डांबरीकरण रस्त्यासाठी ४ कोटी,सोलापूर रोड ते दहीटणे शिव रस्ता करणे यासाठी २० लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असुन गावा-गावात विकास कामांचा धडाका सुरू आहे.यापुढेही शेळगाव गावाला निधी कमी पडू देणार नाही,साठवण तलावाच्या माध्यमातून या भागातील शेती ओलिताखाली येणार आहे तसेच प्रत्येक गावातील मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी व गावातील रस्ते अनेक विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष (दादा) निंबाळकर, बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास (आप्पा) रेणके, साकत सोसायटी चेअरमन बाबासाहेब मोरे,बाजार समितीचे संचालक वासुदेव (बापु) गायकवाड, माजी नगरसेवक भारत पवार, भाजप बार्शी तालुका अध्यक्ष मदन दराडे, बाबाराजे गायकवाड,महेश बोधले,महादेव देवकर, मनोहर वानखेडे,अरूण घोडके, नानासाहेब ताकमोडे, सुहास गायकवाड, काकासाहेब इंगळे, राज गायकवाड, नाना जगताप, अभिजित कापसे,गणेश गवळी, सरपंच प्रकाश बादगुडे, नाना धायगुडे, तुकाराम माने, बाळासाहेब देवकर, सारोळेचे सरपंच बाळराजे गाटे, रामभाऊ आवारे,तुळशीदास गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.