महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ३ कोटी ७० लाख मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यातील खामगाव येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे यासाठी ३० लाख,गाताचीवाडी येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी १५ लाख,झाडी येथील सुरेश जनार्दन मते घर ते दशरथ मारुती सांगुळे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख, झाडी येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी १० लाख,ढोराळे येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी १५ लाख, तांदुळवाडी येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता यासाठी ३० लाख,देवगाव येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी १५ लाख, धामणगाव दु. वार्ड क्र. ४ शाहुनगर येथील सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी १० लाख , धामणगाव दु श्री संत माणकोजी बोधले महाराज परीसरात सिमेंट कॉक्रीट रस्ता यासाठी २० लाख,नारीवाडी येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी २० लाख, पांगरी येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी ३० लाख,पिंपळगाव धस येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी ३० लाख,भांडेगाव येथील जावेद सय्यद यांच्या घरापासून ते गायरानापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे यासाठी १५ लाख,भालगाव येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी २० लाख,मुंगशी येथे गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी ३० लाख,इंदापूर येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी २० लाख,गुळपोळी येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी १५ लाख,चुंब येथील गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसीवणे यासाठी २० लाख निधी मंजूर झाला आहे.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. त्यामुळेच मतदार संघाचा कायापालट होत असुन आजतागायत कोट्यावधींचा निधी आणुन त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला आहे, त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यात कोट्यावधींची विकासकामे चालु आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आभार मानले.