वलांडी जि. लातूर येथील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशी द्या – हिंदू खाटीक समाज
कुटुंबासह सहभागी होत बार्शीत निघाला भव्य मूक मोर्चा
लहान चिमुकल्या मुलींच्या हस्ते बार्शीचे तहसीलदार यांना दिले निवेदन
बार्शीत हिंदू खाटीक समाजाच्या निघालेल्या मूक मोर्चास विश्व हिंदू परिषद बार्शी, जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी, सकल मराठा समाज बार्शी, वंचित बहुजन आघाडी बार्शी, प्रहार संघटना बार्शी, जाणीव फाउंडेशन बार्शी, छत्रपती ग्रुप बार्शी आदींनी जाहीर पाठिंबाचे पत्र दिले.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लातूर जिल्हा देवणी तालुक्यातील वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलींवर त्याच गावातील आरोपी अल्ताफ महेबूब कुरेशी या नराधमाने सलग पाच दिवस अत्याचार केला आहे. सदर आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी व कुटुंबीयास शासनाकडून मदत मिळावी या मागणीसाठी बार्शी शहर व तालुका हिंदू खाटीक समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी शहरातून भव्य मुक मोर्चा काढून बार्शीचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पिडीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे, पिडीत कुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी, पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व आरोपीला तात्काळ फाशी द्यावी ,पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी,संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गाव बंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी अशा अनेक मागण्याचे निवेदन बार्शीचे तहसीलदार कार्यालय मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देण्यात आले. यावेळी माजी खासदार शिवाजी बापू कांबळे व बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हिंदू खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.