महर्षि आनंद सेवा समाजसेवा पुरस्कार अजित कुंकुलोळ यांना प्रदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुणे येथील महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचा महर्षि आनंद सेवा समाजसेवा पुरस्कार अजित कुंकुलोळ यांना बार्शी येथे जैन स्थानक हॉल येथे प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. अशोककुमार पगारिया,पी.एम जैन, प्रा. सदाशिव कांबळे जयचंद सुराणा, सुरेशचंद्र कुंकुलोळ डॉ शांतीलाल रायसोनी, माणिकचंद दुग्गड , चंद्रकांत कोठारी , पदमचंद कांकरिया ,भारत कोटेचा , सुरेश सुराणा , मणीलाल बोथरा , बाळासाहेब तातेड आदी उपस्थित होते. यावेळी पगारीया म्हणाले बार्शीचे समाज भुषण अजित कुंकुलोळ हे समाज सेवत सतत क्रियाशिल असतात त्यांनी आजवर समाज सेवेच्या योगदाना बद्दल या वर्षीचा महर्षि आनंद सेवा समाजसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी कुंकूलोळ म्हणाले व्यस्त कार्यक्रमामुळे पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमात सहभागी न होवू शकल्याने दिलगीरी व्यक्त केली . महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचचे डॉ अशोककुमार पगारिया, पी एम् जैन , प्रा सदाशिव कांबळे यांनी बार्शी येथे येऊन सन्मानपूर्वक पुरस्कार व ट्राफी देवून सन्मान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.