कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय बार्शी येथे महाराष्ट्राची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अमित लाड यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले .यावेळी डॉक्टर अमित लाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक काम व संपूर्ण इतिहास आपल्या भाषणातून नमूद केला.प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुहास सुतार हे उपस्थित होते.यावेळी ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सभासद,वाचक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.