भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका आयोजित ‘नमो चषक’ भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने ‘नमो चषक’ भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवा अंतर्गत डायरेक्ट व्हाॅलीबाॅल (हौशी) स्पर्धेचे बार्शी शहरातील राणी लक्ष्मीबाई उद्यान या ठिकाणी उद्घाटन बार्शी नगरपालिकेचे गटनेते विजय (नाना) राऊत यांच्या शुभहस्ते व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नमो चषक अंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असुन जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घ्यावा असे गटनेते विजय(नाना)राऊत यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळेल व यातून भविष्यात देशाचं नाव उंचावणारे अष्टपैलू खेळाडू घडतील असे सभापती रणवीर राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश (आण्णा) पाटील, बाबासाहेब कापसे, सुधीर पैकीकर, भाजपा सरचिटणीस संदेश काकडे,कोळी सर,डॉ. ढगे,आडत व्यापारी सचिन मडके,उमेश देशमाने तसेच सहभागी खेळाडू उपस्थित होते.