बार्शी तालुक्यासाठी ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर – आ. राजेंद्र राऊत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. राजेंद्र राऊत यांनी दिली.

अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेचा लाभ तालुक्यातील गोरमाळे,उपळे दुमाला, तांबेवाडी, आगळगाव, घाणेगाव, तुर्कपिंपरी, कळंबवाडी आ,मुंगशी आर, मालवंडी, पुरी, उंबरगे, बाभुळगाव, बोरगाव खुर्द, पाथरी,उपळाई ठोंगे,मालेगाव आर, इंदापुर, साकत, गुळपोळी, सासुरे, श्रीपतपिंपरी, शेलगाव मा,मांडेगाव, खांडवी, पिंपळगाव धस, उंडेगाव, धोत्रे, ताडसौंदणे, पानगाव, देवगाव, आळजापुर, राळेरास, सर्जापुर, बाभुळगाव, तावडी, नारी, नारीवाडी, भातंबरे, ज्योतीबाचीवाडी, कांदलगाव, बावी आ, वांगरवाडी, तावरवाडी, जामगाव आ, पांगरी, निंबळक, कोरेगाव, खडकोणी, मळेगाव,धामणगाव दु, रातंजन, कोरफळे, मानेगाव, रुई, काटेगाव, अरणगाव, सारोळे, सुर्डी, बावीआ, चिखर्डे, रऊळगाव, वाणेवाडी इत्यादी गावातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.

बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे,ग्रामविकास मंत्री महाजन,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आ .राजेंद्र राऊत यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या