जयंतीबार्शी

गुळपोळी येथे श्री कालभैरवनाथ जयंती भक्ती भावाने साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गुळपोळी येथील श्री कालभैरव मंदिरामध्ये मंगळवारी श्री कालभैरव जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त श्री कालभैरव मंदिरामध्ये मंगळवारी पहाटेपासून अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रम सुरू होते.तसेच देवाची पुजा व सायंकाळची आरती झाल्यानंतर भक्तांना सौ वंदना रामचंद्र उबाळे यांचे वतीने महाप्रसादाचे प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री कालभैरव जयंतीनिमित्त स्वरूप दर्शन मूर्तीचे उदघाटन पुजारी औदुंबर कृष्णा गुरव व चिरंजीव अभिजीत रामचंद्र उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. गुळपोळीसह बार्शी तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव आणी भक्तांनी जयंती उत्सवासह देवदर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. श्री कालभैरव अन्नदान व नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी जयंती उत्सवाच्या आयोजनाबद्दल प्रसिध्दी माध्यमांना माहिती दिली.

श्री कालभैरवनाथ जयंती साजरी होण्यासाठी अन्नदान व नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे, उपाध्यक्ष राजेंद्र अभिमान चिकणे,सेक्रेटरी राजेंद्र मचाले, उपसेक्रेटरी शहाजी चिकणे, खजिनदार हणुमंत लक्ष्मण पाटील, उपखजीनदार परमेश्वर मचाले, शरद चिकणे, अतुल चिकणे, शिवाजी चिकणे, पपुल्या चिकणे, परमेश्वर चिकणे, राया सावंत, औदुंबर सावंत, महेश मचाले,काका पाटील, महेश चिकणे, रवि सावंत आदींसह व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले.जयंती उत्सवानिमित्त संध्याकाळी अन्नदान व दीपोत्सव साजर करण्यात आला व श्री कालभैरव जयंती कार्यक्रमाची सांगता झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button