दिव्यांग दिनानिमित्त बागवान सोशल फाउंडेशन च्या वतीने गरजवंतास विलचेअर चे मोफत वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील 422 खाजा नगर झोपडपट्टी या ठिकाणी रविवार दिनांक 3 नोव्हेंबर दिव्यांग दिनानिमित्त खाजा नगर या भागातील दिव्यांग मोहम्मद पठाण या गरजवंतास बागवान सोशल फाउंडेशन च्या वतीने विलचेअर मोफत देण्यात आली. यावेळी बागवान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर भाई बागवान, उपाध्यक्ष अन्वर भाई बागवान, सचिव कदीर बागवान , या भागातील समाजसेवक जावेद भाई पठाण, राज्याक भाई शेख, यांच्या हस्ते विलचेअर देण्यात आली.
यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम भाई काजी, अब्बास भाई शेख, समीर भाई शेख, व या भागातील असंख्य युवक व महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी मोफत विलचेअर देण्यात आली. यामुळे माझी रोज च्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी मोहम्मद पठाण यांनी बागवान सोशल फाउंडेशनचे या मोलाचे सहकार्य केले. याबदल आभार व्यक्त केले.