मालवंडीत शंभराहून अधिक नागरिकांची डोळे तपासणी , ३१ नागरिकांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था मालवंडी, एच. व्ही देसाई नेत्र रूग्णालय पुणे आणि आरोग्य उपकेंद्र मालवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मालवंडी परिसरातील शंभराहून अधिक नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. डोळे तपासणीचे हे दुसरे वर्ष असून या वर्षी जवळपास वीस नागरिकांना मोफत चेष्मे वाटप करण्यात आले. ३१ नागरिकांना मोतिबिंदू असल्याने तपासणीत दिसून आल्याने त्यांच्या डोळ्यावर पुढील शस्त्रक्रिया एच.व्ही देसाई नेत्र रूग्णालय पुणे येथे मोफत केली जाणार आहे. शिबीराचे उदघाटन पंचायत समिती बार्शीचे अतिरिक्त गट विकास अधिकारी किशोर अंधारे, आरोग्य उपकेंद्राचे डॉ.प्रकाशकुमार कदम,माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रविण पाडुळे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.मोहसीन पटेल,पोलिस पाटील पांडुरंग सलगर आदींच्या हस्ते करण्यात आले. डॉ.पटेल, राजश्री घुगे, कैफ काझी यांनी डोळे तपासणी केली. या वेळी विशाल अंधारे, विठ्ठल खंडागळे, हनुमंत होनमाने,युन्नूस मुजावर , डॉ.विठ्ठल शेळके, डॉ.लता लिके, पिंटू पाडूळे, नितीन पाटील, बाळु म्हेत्रे, शाहू कावरे, बालाजी गिड्डे आदी उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्राच्या सर्व आशा परिचारिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष समाधान काटे यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबीर घेण्यात आले.