वंचित बहुजन आघाडी बार्शी युवक शहराध्यक्ष पदी शरद बनसोडे यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीतील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी तालुका आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बार्शी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शरद बनसोडे यांची बार्शी शहर अध्यक्षपदी वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग खांडेकर व जिल्हा उपाध्यक्ष सोनाजी काकडे यांच्या हस्ते बनसोडे यांना बार्शी शहर युवक अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
तसेच आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक शिंदे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये पांडुरंग खांडेकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी दिनेश लोंढे लहू बसवंत योगीराज उकिरडे आकाश कांबळे मिलिंद बनसोडे अविनाश भालशंकर रवी गायकवाड सागर विभुते गिरीश अमित बोकेफोडे कांबळे इकबाल शेख विनोद वंजारी नितीन शिंदे शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.