बार्शीमहाराष्ट्र

एकविसाव्या शतकात कौशल्य विकास महत्वाचा : डॉ. कामत

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : एकविसाव्या शतकातील शिक्षण प्रवाहात कौशल्य विकास याची मोठी आवश्यकता आहे. भविष्यातदेखील ही कौशल्य महत्वाची असतील, असे मत अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांनी व्यक्त केले.
येथील लेखक सचिन वायकुळे लिखित ‘नेतृत्त्व विकास आणि जनसंपर्क’ या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते पार पडले, याप्रसंगी ते बोलत होते.

संभाषण कौशल्य , सुयोग्य विचार , सहयोग भाव तसेच मिर्मिती ही कौशल्य वर्तमानात आणि भविष्यातही महत्वाची आहेत. नव्या पिढीसाठी तसेच विविध क्षेत्रात नेतृत्त्व करण्यासाठी वायकुळे यांचे हे पुस्तक उपयुक्त असल्याचेही डॉ. कामत म्हणाले.

कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनने या पुस्तकाची छपाई केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वायकुळे यांचे ‘नेतृत्त्व विकास आणि जनसंपर्क’ हे चौथे पुस्तक आहे.
यावेळी विद्यापिठाचे प्र. कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, अहिल्यादेवी होळकर अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर तसेच लेखक सचिन वायकुळे,, देवानंद चिलवंत , डॉ. भास्के, माधवी वायकुळे ,वेदांत वायकुळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button