दुचाकी वरील अपघातग्रस्तांसाठी सरसावले भगवंता सेना दल
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील परंडा रस्त्यावर वैदु वस्ती शेजारी, दोन दुचाकींचा अपघात झाला. दोन्ही दुचाकी वरील दुचाकी स्वार दुचाकीसह रस्त्यावरती पडले होते. यावेळी एका दुचाकी स्वाराला भोवळ येऊन तो काही वेळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. रस्त्याच्या कडेला व ये – जा करणाऱ्या लोकांनी गर्दी करून फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.
त्याचवेळी भगवंत सेना दलाचे सदस्य स्वप्निल पवार घटनास्थळी उपस्थित झाले. स्वप्निल पवार यांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने, लागलीच सदरील दुचाकी स्वराला रस्त्याच्या बाजूला घेऊन प्राथमिक उपचार केला. स्वप्निल पवार यांच्या प्रयत्नाने काही वेळातच सदरील युवक शुद्धीवर आला. भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आत्तापर्यंत विविध अपघातातील नऊ व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. बार्शी शहर आणि परिसरामध्ये आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी 9922914009 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन भगवंत सेना दल प्रमुख धिरज शेळके यांनी केले आहे. बार्शी शहर आणि तालुक्यातून विविध स्तरातून भगवंत सेना दलाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.