संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन बार्शी आयोजित रक्तदान शिबिर , १०८ रक्तदत्यांनी केले रक्तदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन बार्शी यांच्या वतीने दि १८ रोजी आयोजीत रक्तदान शिबिरात १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या शिबीराचे उद्घाटन डॉ बीवाय यादव , महादेव बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित कुंकूलोळ , जयकुमार शितोळे. समाधान राऊत, आनंद चव्हाण लोखंडे , अंगद अंबुरे , चंद्रकांत उंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ यादव म्हणाले संत निरंकारी मंडळ हे फार मोठे सेवाभावी मंडळ असून समाजाला आशा मंडळाची फार गरज आहे. तर सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेव जी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मंडळ जगभरामध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करत आहे, तसेच स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे काम पूर्ण जगभरामध्ये निस्वार्थ भावनेने करत असल्याचे महादेव बिराजदार यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल बचुटे , किशोर ढोले ,ऋषिकेश शेळके , संगीता भोसले उत्तम कावरे , विश्वनाथ कापसे , राजेंद्र चव्हाण शशिकांत शिंदे आदींनी परिश्रम घेत. शिबीरास आलेल्या सर्वाना मिशनचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.