श्रीमान रामभाई शाह रक्तपेढी कडुन१०० रक्तदात्यासह कुटुंबाची रक्त तपासणी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर प्रतिनिधी : जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून बार्शीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटी ,शाखा बार्शी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीकडून १०० रक्तदाते व त्यांचे कुंटूबातील व्यक्तीचा मोफत सी.बी.सी. रक्तगट , हिमोग्लोबिन याचे तपासणी करण्यात आली. तसेच रक्तपेढीमध्ये सातत्याने अफेरिसिस (प्लेटलेट) दान करणार्या ७५ युवक युवतींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ संजय आंधारे ,डॉ अमित पडवळ , डॉ श्रद्धा पाटील,डॉ अजित आव्हाड, डॉ विक्रम निमकर,रेडक्रॉस चे सचिव अजित कुंकूलोळ आदीनी रक्तदात्यांचा ऑक्सीमिटर व हँडवॉश देवून सन्मान केला यावेळी प्रा दिलीप कराड, अशोक डहाळे , प्रताप जगदाळे उपस्थीत होते. यावेळी शतकवीर रकतदाते सुधीर तमेवार तम्मेवार व आशिष पटवा यांचा विशेष सन्मान केला.
रक्तदात्यांच्या सत्कार प्रसंगी डॉ अमित पडवळ म्हणाले बार्शी शहर हे मेडीकल हब म्हणून पुढे येत आहे. रुग्नांची सर्जरी करताना रक्ताची मोठी गरज असते त्यासाठी नॅटं टेस्ट करून गुणवत्तापूर्ण रक्त पुरवठा करणारी बार्शीतील श्रीमान रामभाई शहा ब्लंड बॅक ही एकमेव आहे. या अंतर राष्ट्रीय सुविधा बार्शीत उपलब्ध होत आहे . येथील रक्तदाते हे केवळ ब्लंड डोनर नसुन ते रुग्णांसाठी लाईफ डोनर आहेत. तसेच डॉ अजित आव्हाड म्हणाले बार्शी तालुक्यात श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरीत करून रक्तदानाची मोठी चळवळ उभी केली आहे. यासोबत येणाऱ्या काळात रक्तदानासोबत अवयव दान करण्याची चळवळ उभी करावी लागेल ही काळाची गरज आहे. डॉ संजय अंधारे म्हणाले रक्तदान करण्याने रुग्णांचा जीव वाचतो आहे. मात्र आज काही प्रमाणातच लोक रक्तदान करतात तरी मोठ्या संख्येने रक्तदान होणे आवश्यक असल्याचे मत त्यानी केले.
यावेळी डॉ श्रध्दा पाटील यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत पुढील काळात रक्तदान करून असेच प्रतिसाद रक्तपेढीस द्यावा असे आव्हान देखील केले. सूत्रसंचालन अजित कुंकुलोळ तर आभार डॉ विक्रम निमकर यांनी केले.