उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील गाडेगाव रोड येथे २० कोटी मंजुर उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बार्शी ग्रामीण रूग्णालय ३० खाटांवरून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता,त्यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणार असुन या रुग्णालयात बार्शी तालुक्यासह शेजारील तालुक्यातील रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे.आमदार राजाभाऊ राऊत हे बार्शी तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत,त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे रूग्णालयाचे काम पुर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.
नवीन उपजिल्हा रुग्णालयात आर.सी.स्ट्रक्चर (तिन मजले), ७० पेशंटची काॅटची सोय,सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅबोरेटरी, ब्लड बँक, कन्सल्टिंग रुम,डॉक्टर्स रुम,नर्सेस रुम,वाॅर्ड स्टोअर (पुरूष व महिला)रुम,सुसज्ज लिफ्टची सोय,पुरूष व महिला शौचालय सोय,पार्कींग सोय,पावसाचे पाणी साठवण प्रकिया, सोलार सोय,वाॅटर टॅंक इत्यादी सोयी सुविधा असणार आहेत.
बार्शी शहरातील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले आहे,यासाठी नवीन इमारतीचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते करण्यात आले असुन आमदार झाल्यापासून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासाठी यश येत आहे ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे तसेच मतदार संघाचा विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करून कायम विकासाचे राजकारण करणार आहे,या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असुन त्यांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,प्रशांत कथले मालक, श्रीकांत शिंदे,संदेश काकडे, दीपक (आबा) राऊत,भारत पवार सर, भैय्या बारंगुळे,कय्युम पटेल, डॉ.शितल बोपलकर, डॉ. कदम सर,डॉ. रविंद्र माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भालशंकर भालके,मंदार कुलकर्णी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर,नगरसेवक,पत्रकार बांधव उपस्थित होते.