बार्शीमहाराष्ट्र

आकाश दळवी याची प्रकृती चिंताजनक , सोलापूरला रवाना

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सामाजिक कार्यकर्ते व बार्शी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी याच्यावर मध्यरात्री झालेल्या जीवघेण्या खुनी हल्ल्यामध्ये, तो गंभीर जखमी झाला असून, गेले दोन दिवस बार्शी येथील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

आकाश डोक्याला, हाताला, पायाला गंभीर मार लागल्यामुळे, काल सायंकाळच्या दरम्यान आकाशची प्रकृती खालावल्याने, त्याला सोलापूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रातोरात रवाना करण्यात आले आहे. आकाश दळवी याची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी आकाशचा मित्र परिवार सोशल प्रार्थना करत आहे. तर आकाशच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल होत आहेत.

आकाश दळवी याच्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे करत आहेत. हल्लेखोरांवर प्रशासन नेमकी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button