समजतील तरुणांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी पतसंस्थांचे मोठे योगदान – जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सध्या समाजात बेकरीचे प्रमाण जास्त आहे. पण आपले तरुण होतकरू आहेत त्यांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी आपण प्रोत्साहित केले पाहिजे. समजतील तरुणांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. सर्वच पतसंस्थांनी सचोटीने कारभार करावा असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी केले.
श्री माऊली नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या बार्शी शाखेचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यापीठावर सहाय्यक निबंधक शाम दडस, लेखा परीक्षक मिठू काळदाते, सोलापूर जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन बाब्रूवान काशीद, विकास उकिरडे, सचिन महाडिक, प्रा. किरण देशमुख, गणेश गोडसे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना श्री किरण गायकवाड म्हणाले की, या संस्थेचे ठेवी, कर्जवाटप योग्य आहे. एन पी ए शून्य टक्के आहे. हे संस्थेचा कारभार उत्तम असल्याचे लक्षण आहे. या संस्थेच्या अल्पवधित चार शाखा झाल्या असून भविष्यात याचे बँकेत रूपांतर व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.