बार्शीत युगदर्शक पुरस्काराने ११ गुणवंतांचा गौरव

0

चांगल्या कर्माची फळे चांगली मिळतात – पिंपळकर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : माणूस कर्माने जर चांगला असेल तर त्याला कोणत्याही शास्त्राची गरज पडत नाही. माणसांची वागणुक चांगली पाहिजे, त्यांच्यापुढे जगातील कसलेही वास्तुशास्त्र अथवा ज्योतिषशास्त्र इ. फेल आहे. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला युनिक बनविले आहे ते समजून घेत स्वत:ची किंमत समजून घेतली पाहिजे. निसर्गाकडे चांगला नियम आहे, त्यानुसार चांगल्या कर्माची फळे म्हणून अनेक पटीने त्याचा परतावाही मिळतो. पुराण, अध्यात्मात बार्शीतील हरि आणि हराचे (शैव, वैष्णव) मोठे महत्व असल्याचे प्रतिपादन पुणे येथील आनंदी वास्तुचे आनंद पिंपळकर यांनी केले.

युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे शनिवारी दि.२९ रोजी पार पडलेल्या युगदर्शक आयकॉन पुरस्काराच्या दहाव्या वर्षीच्या सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील ११ गुणवंतांना सन्मानीत करण्यात आले.

पिंपळकर म्हणाले, माणूस आपल्या पदानुसार आपले अ‍ॅटीट्यूड स्वाभाविकपणे दाखवितो ते सहजपणे त्यांच्या वागण्यातून लक्षात येते. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. सध्या कौतुक करण्याची कमी आणि जळण्याची प्रवृत्ती जास्त वाढत असलेल्या काळात युगदर्शक पुरस्कारासारखे कार्यक्रम आयोजित करुन काम करणाèयांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणाèया आयोजक नितीन भोसले यांचे कौतुक केले पाहिजे. बार्शीकरांच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्नशील व झगडत असतांना मी सोपल साहेबांना अनेकवेळा पाहिले आहे.

अध्यक्षीय समारोपात माजी मंत्री अ‍ॅड.दिलीप सोपल म्हणाले, काम पाहून वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांना दरवर्षी सन्मानीत केले जाते, यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. यातील निवड झालेल्या अनेकांना मी त्यांच्या लहानपणापासून जवळून पाहिले असल्याचे सांगत प्रत्येकाची जीवनशैलीही विशद केली. सातत्याने पुरस्काराचे दहा वर्षे यशस्वी आयोजनाबद्दल नितीन भोसले व सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुकही केले.
मानाचा फेटा, शाल. पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व आकर्षक भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरुप होते. आयोजक नितीन भोसले यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ओमप्रकाश शेटे, प्रशांत माळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, अशोक सावळे, संतोष सुर्यवंशी, उषा पवार, क्रांती कोळी, अनिता भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले, राष्ट्रगीताने सांगता झाली. अपर्णा दळवी यांनी संचलन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौस्तुभ पेठकर, बप्पा कसबे, कृष्णा उपळकर, दिनेश नाळे, सतीश सपकाळ, सुरज हुंबे, हेमंत रामगुडे, विशाल नवले, गणेश शिंदे, सुरज मुल्ला आदींनी परिश्रम घेतले.


यांचा झाला सन्मान

ओंकार एकशिंगे (युवा), अ‍ॅड.प्रशांत एडके (विधी), डॉ.प्रमोद जाधवर (वैद्यकिय), राहुल कोंढारे (उद्योग), मल्लिकार्जुन धारुरकर (पत्रकारिता), दिपक रोंगे (सरपंच), सुरेश शेळके (समाजसेवा), सौदागर तांदळे (महसूल), नितीन मुंडे (पोलिस), रामराजे गोरे (कृषि), शिल्पा शेटे (महिला, सामाजिक)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या