दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारांकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे, दि. २० : भारत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून वर्ष २०२५ करिता दिव्यांगजनांच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारांकरिता ऑनलॉईन माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्ष २०२५ करिता दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरसकारांकरिता अर्ज, नामांकन सादर करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल १५ जुलै २०२५ पर्यंत सुरु आहे.

अर्ज नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in वर भरण्यात यावे. पुरस्काराकरिता १५ जुलै २०२५ पर्यंत प्राप्त अर्ज, नामांकनावर विचार करण्यात येईल. अर्ज केलळ राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन सादर करावेत. नामांकनामध्ये पोअर्लवर प्रारुपमध्ये निर्दिष्ट सर्व प्रासंगिक विवरण समाविष्ट असावेत. ज्यामध्ये उल्लेखनीय आणि प्रेरक कामगिरींना स्पष्टपणे समाविष्ट करावेत तसेच कामगिरींशी संबंधित सहाय्यक दस्तऐवज सुध्दाअपलोउ करावेत. भौतिक स्वरुपात किंवा कोणत्याही अन्य स्वरुपात प्राप्त अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पात्रता निकष आणि इतर विवराणाकरीता विभागाची वेबसाईट www.depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पोर्टलवर उपलब्ध दिव्यांग व्यक्तिंच्या सशक्तीकरणाकरिता राष्ट्रीय पुरस्कारांकरिता दिशानिर्देश पाहू शकता, असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या