महाराष्ट्रसोलापूर

आषाढी वारी निमित्त पंढरपूर शहर व विविध ठिकाणी दारू बंदीचे आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि.20 : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2025 निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दिनांक 04 जुलै 2025 ते दिनांक 07 जुलै 2025 रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 5 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील. दिनांक 09 जुलै 2025 व दिनांक 10 जुलै 2025 रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 5 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने सायंकाळी 05.00 वाजेपासून बंद. तसेच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2025 निमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखणेसाठी, खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

सोमवार दि. 30 जुन 2025 – नातेपुते पूर्ण दिवस बंद राहिल , मंगळवार दि.1 जुलै 2025 माळशिरस, अकलुज पूर्ण दिवस बंद राहिल , बुधवार दि. 2 जुलै 2025 रोजी वेळापूर, बोरगांव, श्रीपूर, माळीनगर पूर्ण दिवस बंद राहिल. गुरुवार दि.3 जुलै 2025 रोजी भंडीशेगाव, पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद राहिल. शुक्रवार दि.4 जुलै 2025 रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद राहिल. या आदेशाचे उल्ल्ंघन करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button