बार्शीयात्रा

आजपासून मालवंडीच्या श्री शेखागौरी यात्रेस प्रारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ‘श्री शेखागौरी’ देवस्थानची यात्रा उद्या शुक्रवार (ता .५) मे पासून सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी असून धार्मिक कार्यक्रम देखील परंपरेप्रमाणे होणार आहेत. शुक्रवार रात्री दहा वाजता संदल व ताफे निघतील ,लाईट डेकोरेशन व शोभेचे दारूकाम असेल यासह लावणी सम्राज्ञी अर्चना जवळेकर व सह कलाकारांचा ‘तुझ्यात जीव रंगला’ कार्यक्रम होणार आहे. शनिवार( ता .६) मे रात्री सात वाजल्यापासून सोंगाचा कार्यक्रम, बॅंड’चा जंगी मुकाबला,शोभेचे दारूकाम, ऑर्केस्ट्रा गोल्डन स्टार कोल्हापूर व लोकनाट्य तमाशा असणार आहे. यात्रेची सांगता रविवार (ता.७) मे रोजी होणार असून सकाळी दहा वाजता कलगीतुरा, लोकगीते व धनगर ओव्या, दुपारी दोन वाजल्यापासून जंगी कुस्त्यांचा फड सुरू होणार आहे. लावणी सम्राज्ञी साधना पुणेकर यांचा कार्यक्रम ‘पाव्हणं नाद करायचा नाय’ हा कार्यक्रम रात्री होणार असून यात्रेची सांगता होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button