मनपा मुख्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) तिथीनुसार साजरी करण्यात आली. स्वागत कक्षाजवळ मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, उपायुक्त नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, स्वीय सहाय्यक दिलीप काठे, नितीन गंभीरे, कृष्णा फडोळ, विरसिंग कामे, सागर पीठे आदी मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच लिंगायत वीरशैव समाजाचे अध्यक्ष गणेश भोरे, प्रकाश गवळी, अरुण आवटे, अण्णा कोठुळे, वैभव पाचपाटील, दुर्गेश भुसारे, धोंडू नाना हिंगमिरे, बाळासाहेब हिंगमिरे, वैभव डबे पाचपाटील, वकील सुशीलाताई अंधोळकर, संगीता हिंगमिरे, शैला तोडकर, सुधीर भुसारे, मोहन आवटे, उमेश पाचपाटील, संतोष घोडके, अजिंक्य हिंगमिरे, मनोज झळके, संदीप लिंगायत, मंगेश अंधोळकर उपस्थित होते.
आयुक्तांकडून ईदच्या शुभेच्छा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ईदगाह मैदानावर जाऊन शहर-ए- खतीब हिसामोद्दीन मुनीरोद्दीन खतीब यांना आणि उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, खासदार हेमंत गोडसे आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.