गुंड भेळचे मालक उमेश गुंड यांचे दुःखद निधन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कै. उमेश गुंड यांच्या आजोबांनी डोक्यावर पाटी घेऊन, गावभर आणवानी पायांनी फिरून, हॉटेल व्यवसायामध्ये आपला वेगळा ठसा उमटवून, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील खवय्यांसाठी तिसऱ्या पिढीपासून गुंड भेळच्या माध्यमातून स्वादिष्ट आणि चविष्ट सेवा देणारे, बार्शीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक, गुंड भेळचे मालक कै. उमेश गुंड यांचे आज दिनांक 9 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. उमेश गुंड यांचे अंदाजे वय 47 वर्षे असून, त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण बार्शी शहर आणि परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, भावजई, पुतणे, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.