बारबोले कोट्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नुकताच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी मनोगत व्यक्त करताना बार्शी तालुक्यातील राजकीय हुकूमशाही व भ्रष्टाचार या मुद्द्यावर जोरदार भाष्य केले तसेच राज्यातील व केंद्रातील भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली.
माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांच्या पक्षाप्रवेशामूळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये नवचैतन्य निर्माण झाले व आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निश्चित यश संपादन होईल असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी खालीलप्रमाणे करण्यात आल्या :-
गोरख बाजीराव गाढवे तालुका उपाध्यक्ष, संतनाथ उर्फ बंटी दत्ता पोफळे पांगरी जि प गट अध्यक्ष, रियाज इस्माईल पठाण कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बार्शी तालुका, अमोल राजेंद्र एडके उपाध्यक्ष उपळाई जि प गट राष्ट्रवादी युवक काँग्रेस बार्शी तालुका, अजिंक्य औदुंबर भांगे अध्यक्ष आगळगाव पंचायत समिती गण, महेश पांडुरंग जाधवर उपाध्यक्ष आगळगाव पंचायत समिती गण, अजय महारुद्र जाधवरअध्यक्ष पांगरी पंचायत समीती गण, पूजा किरण देशमुख महिला कार्याध्यक्ष बार्शी तालुका, सचिन ढमढेरे प्रभागध्यक्ष प्रभाग क्रमांक 17, रोहन जाधव प्रभागाध्यक्ष प्रभाग क्रमांक 14
याप्रसंगी राष्ट्रवादी चे नेते विश्वास बारबोले, निरंजन भूमकर, राकेश कामठे प्रदेश कार्याध्यक्ष, सुवर्णा शिवपुरे, शरद लाड सोलापूर जिल्हा निरीक्षक, ऍड गणेश पाटील युवक जिल्हाअध्यक्ष सोलापूर, अरुण आसबे कार्यालयीन सरचिटणीस, अभिषेक आव्हाड वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष, मोहसीन शेख सचिव रा यु कॉ, अतुल खरात जिल्हा सचिव रा यु कॉ, प्रशांत बाबर, चेतन गायकवाड, इकबाल पटेल, विक्रम सावळे, भारत बप्पा देशमुख, महेश चव्हाण, प्रा किरण देशमुख, विक्रम पवार, अमोल बदे, प्रशांत भालशंकर, आदेश वाणी, स्वप्नील काळे, उमेश नेवाळे, सूर्या म्हस्के, जोएब शेख, सुश्मित बागल, रफिक बासडे, दैवशला जाधवर, स्नेहा निंबाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.