मुख्याध्यापक भारत पवार व क्रीडाशिक्षक बाळासाहेब नलवडे सेवानिवृत्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : संपन्न प्रशालेत काम करत असताना शाळा , सहकारी व विद्यार्थी हे एक कुटुंब मानुन काम केल्याने मानसिक समाधान मिळाले असे विचार शा .धा .जी. मॉडेल हायस्कूल चे मुख्याध्यापक भारत पवार यांनी सेवानिवृत्ती कार्यक्रमात व्यक्त केले.
वाय पी एज्युकेशन सोसायटी व संस्थेच्या सर्व शाखा तसेच कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने भारत पवार व बाळासाहेब नलवडे या क्रीडाशिक्षकांचा सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका वैशाली टिळक होत्या. या वेळी बाळासाहेब नलवडे यांनी प्रशालेतील आठवणींना उजाळा दिला व सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे पर्यवेक्षक संजय पाटील , संस्था सचिव नागनाथ देवकते संचालिका वैष्णवी हातोळकर निवृत्त शिक्षक दिवाकर नारकर आयुब शेख यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्तींच्या शैक्षणिक क्रीडा व सामाजिक कार्याचा गौरव केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी संचालक शशिकांत गोडगे भालचंद्र जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे यांनी तर सूत्रसंचालन प्रताप दराडे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या