श्री भैरवनाथ यात्रे निमित्त आज सुर्डी गावात ‘भैरवनाथ केसरी’ चे आयोजन, कुस्त्यांचा जंगी फड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सालाबादाप्रमाणे चैत्री यात्रे निमित्त सुर्डी ता.बार्शी येथे श्री.भैरवनाथ यात्रा पार पडत आहे. या यात्रा महोत्सवात उद्या दि.8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन समस्त गावकरी व यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून तसेच दिल्लीवरुन सुर्डीच्या मैदानात पैलवान दाखल होणार आहेत.
सुर्डी गावाला कुस्तीचा मोठा वारसा आहे. गतवर्षी पासुन गावात महाराष्ट्रातील चांगल्या पैलवान जोडींचे नेमून नियोजनबद्ध मैदान घेण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सुर्डीच्या फडाला मल्लांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शिस्तबद्ध मैदान होत असल्याने तसेच कुस्तीच्या चांगल्या लढती पाहायला मिळत असल्याने पंचक्रोशीतील कुस्तीशौकीन सुर्डीच्या फडात दाखल होतात. या फडात मल्लांना चांगला इनाम दिला जातो. यंदा देखील मोठ्यासंख्येने कुस्तीशौकीनांनी फडात हजेरी लावावी असे आवाहन यात्रा कमिटी व कुस्ती पंच कमिटीने केले आहे.
उद्याच्या मैदानात खालील प्रमाणे लढती होणार आहेत…
1) पै.प्रणव कुमार, दिल्ली × पै.संतोष जगताप अकलूज ( इनाम 51 हजार )
2) पै.मोईन पटेल, कुर्डुवाडी × पै.अक्षय जगदाळे, अकलूज ( इनाम 41 हजार )
3) पै.अविनाश वडतिले, बार्शी × पै.सुमित भोसले, कोल्हापूर ( इनाम 31 हजार )
4) पै.प्रविण घाडगे, बार्शी × पै.युवराज जगताप, कुर्डुवाडी ( इनाम 25 हजार )
5) पै.सुरज गवळी, बार्शी × पै.निलेश जाधव, कुर्डुवाडी ( इनाम 20 हजार )
6) पै.प्रशांत चंदनकर, कुर्डुवाडी × पै.सागर सदावर्ते, बार्शी ( इनाम 15 हजार )
7) पै.सुनिल खुने, उपळाई × पै.मशिद शेख, कुर्डुवाडी ( इनाम 10 हजार )
8) पै.रेवण जाधव, आगळगाव × पै.आशुतोष गायकवाड, कुर्डुवाडी ( इनाम 5 हजार )
9) पै.श्रीराम गटकुळ, रस्तापुर × पै.गणेश धुमाळ, कुर्डुवाडी ( इनाम 5 हजार )
इनाम रुपये 100 ते 2000 पर्यंत च्या इतर कुस्त्या मैदानात फिरवून लावण्यात येणार आहेत. या कुस्ती मैदानासाठी पै.मोहसिन आतार, कोरफळे कुस्ती निवेदन करणार आहेत. तर लऊळ ता.माढा येथील हलगी संघ मैदानाची रंगत वाढवणार आहे.