बार्शीत युवक काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने पोस्टकार्ड अभियान राबवून खा. राहुलजी गांधी यांच्या निलंबनाचा केला निषेध

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या आदेशानुसार मा खा राहुलजी गांधी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करणे व शासकीय निवासस्थान सोडायला लावण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना पोस्टकार्डद्वारे निषेध नोंदवण्यात आला जवळपास शहर व तालुक्यातून चार ते पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्यात येतील असे युवक काँग्रेस शहराध्यक्ष निखिल मस्के यांनी सांगितले.
देशात वाढती महागाई, गगनाला भिडलेल्या गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती, वाढती बेरोजगारी या देशापुढील प्रमुख समस्या असून त्याकडे लक्ष न देता गोरगरीब भारतीयांच्या खिशातून काढलेला पैसा उद्योगपती मित्रांवर खर्च करण्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांनी अदानी उद्योग समूहात विस हजार कोटी रुपये कोणाचे याचे उत्तर सर्वप्रथम भारतीयांना द्यावे असेही पत्रातून विचाण्यात येणार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष डॉ विजय साळुंकेंनी सांगितले.
या अभियानावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष जुगलबापू तिवाडी, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष वसिमभाई पठाण, तालुकाध्यक्ष सतीश पाचकूडवे, महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली झगझाप, तालुकाध्यक्ष रंजना साळुंके, युवक अध्यक्ष निखिल मस्के, संतोष शेट्टी, शहर उपाध्यक्ष माणिक पवार, सरचिटणीस अजित कांबळे, जेष्ठ नेते बप्पा सुतार, सेवादलाचे विष्णू अस्वदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.