बार्शीत हनुमान जन्मोत्सव निमित्त वडार समाजाची भव्य मोटार सायकल रॅली
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरात हनुमान जन्मोत्सव निमित्त वडार बांधवाच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. सर्व प्रथम वडार समाज हनुमान मंदिर सुभाष नगर येथील हनुमान च्या मुर्तीस ‘ मी वडार महाराष्ट्राचा ‘ संघटनेचे महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती सुनिताताई जाधव आणि समाजातील प्रतिष्ठीत मंडळी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून रॅलीस सुरूवात करण्यात आली.
रॅली मध्ये ‘ जय बजरंग जय वडार ‘ चा नारा देत बहुसंख्य बांधव उपस्थित होते. ही रॅली बार्शीतील प्रमुख मार्गावरून फिरून हनुमान मंदिर, जुनी रेल्वे लाईन येथे विसर्जीत करण्यात आली.
त्याचबरोबर बार्शीत वड़ार समाज हनुमान मंदिर, सुभाष नगर, तळेवाडी प्रतिष्ठान आणि हनुमान मंदिर , जुनी रेल्वे लाईन येथे समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक हनुमान भक्तानी याचा आस्वाद घेतला.
यावेळी संतोष मोहीते, पांडुरंग आस्वदे, लहु मोहीते, सचिन माने, आण्णा जाधव, आनंद इटकर, गणेश जाधव, सोमा चौगुले, भानुदास जाधव, पप्पु चौगुले, अविनाश जाधव, दिलिप इटकर, गणेश पवार, दिनेश पवार, निलेश इटकर, आण्णा चौगुले, संपत जाधव यांच्यासह अनेक वडार बांधव सहभागी होते.