भारत देशातील लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या संघ- भाजपा प्रणित सरकारला उलथून टाका
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : देशात संघ-भाजपा प्रणित सरकारकडून लोकशाही संपवण्याचा कट रचला असून भारतीय संसदीय लोकशाही व भारतीय संविधान याला धोका निर्माण केला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रीय नेते मा राहुलजी गांधी यांनी संसदेत मोदी व अदानी यांच्या मैत्री संदर्भात व अदानी उद्योग समूहाची चौकशी व्हावी व अदानीच्या सेल कंपनीत गुंतवलेले 20000 कोटी रुपये कोणाचे आहेत असा प्रश्न विचारल्याने राहुलजी गांधी यांचे सदस्यत्व रद्द करणे व तात्काळ शासकीय निवासस्थान सोडायला लावणे या गोष्टी संसदीय लोकशाहिला धरून नाहीत याचा निषेध करीत आहोत.
देशाच्या हितासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढेन व देशासाठी प्राणत्याग करणाऱ्या इंदिराजी गांधी, देशासाठी बलिदान देणारे राजीवजी गांधी यांच्या कुटुंबात जन्मने हार्दिक राहुलजींचा गुन्हा आहे का? का नरेंद्र मोदींजी व अदानी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून 20000 कोटी रुपये कोणाचे हार्दिक प्रश्न विचारणे हार्दिक गुन्हा आहे का? असा प्रश्न जिल्हा उपाध्यक्ष जुगलबापू तिवाडी यांनी विचारला यापुढे तालुक्यात व शहरांत कॉर्नर सभा, पोस्टकार्ड अभियान, जयभारत सत्यागृह अभियान राबवून राहुलजींवर झालेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध केला जाईल असे प्रतिपादन बार्शी विधानसभा युवक अध्यक्ष निखिल मस्के यांनी केले
अदानी यांच्या संपत्तीची चौकशी करा ही मागणी करणाऱ्या किंवा संघ-भाजप ला विरोध करणारांच्या मागे शासकीय यंत्रनांचा गैरवापर करून जेलमध्ये टाकणे, अश्या प्रकाराने इथली लोकशाही संपवण्याचा डाव नक्कीच हणून पाडू असे तालुकाध्यक्ष सतीश पाचकूडवे यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष जुगलबापू तिवाडी, अल्पसंख्यांक सेल सोलापूर जिल्हाध्यक्ष वसिमभाई पठाण, तालुकाध्यक्ष सतीश पाचकूडवे, शहराध्यक्ष डॉ. विजय साळुंके, विधानसभा युवक अध्यक्ष निखिल मस्के, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना साळुंके, शहराध्यक्ष सोनाली झगझाप, सेवादलाचे विष्णू अस्वदे, उपाध्यक्ष माणिक पवार, जेष्ठ नेते बप्पा सुतार, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.