डाॅ. शिवप्रसाद गुळमिरे यांचे वैद्यकिय परिक्षेत सुयश
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील डाॅ . शिवप्रसाद विजयकुमार गुळमिरे याने फेब्रूवारी २०२३ मध्ये झालेल्या एम. बी.बी. एस .च्या अंतिम परिक्षेत ७० टक्के गुण मिळवून उत्तम यश मिळवले आहे. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे त्याने आपला एम . बी. बी. एस . चा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमासाठी त्याने प्रवेश परिक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवेश मिळवला होता.
नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे संस्थापक कै. गुरुवर्य भगवान बसलिंगप्पा बुचडे व मोहा ता. कळंब येथील प्रगतीशील शेतकरी कै. प्रल्हाद नारायण गुळमिरे यांचा शिवप्रसाद हा नातू आहे. शिवप्रसादचे वडील विजयकुमार गुळमिरे हे कुंकुलोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत . आई सौ. ज्योत्स्ना गुळमिरे कुंकूलोळ हायस्कूलमध्ये ग्रंथपाल पदावर सेवारत आहे . अत्यंत विनयशील व सुस्वभावी डाॅ. शिवप्रसाद गुळमिरे यांचे चुलते भैरवनाथ बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक संतोष गुळमिरे व आध्यात्मिक मार्गदर्शक ब्रह्माकुमार मोहनभाई बुचडे यांच्यासहित सर्व नातलग शहरातील मान्यवरांकडून डाॅ. शिवप्रसादवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .