उद्घाटनबार्शी

तावडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील तावडी येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते २ कोटी ४८ लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच तावडी गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.

तावडी येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी, अंतर्गत पाईपलाईन, विहीर करणे यासाठी ६८ लाख,अरणगाव ते तावडी रस्ता डांबरीकरण करणे यासाठी १ कोटी ६० लाख, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ७ लाख,२५/१५ योजने अंतर्गत गावाअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख,१५ व्या वित्त आयोगातून बंदीस्त गटार करणे यासाठी ३ लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

‌ बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असुन गावा-गावात विकास कामांचा धडाका सुरू आहे.यापुढेही तावडी गावाला निधी कमी पडू देणार नाही,बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या भागातील शेती ओलिताखाली येणार आहे तसेच प्रत्येक गावातील मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी व गावातील रस्ते अनेक विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक अमृत (नाना) राऊत,सरपंच गणेश आरगडे, उपसरपंच हनुमंत कसबे,रमेश आरगडे, बंडू बचुटे,रामहरी मोरे,परमेश्वर खंडागळे,मनोहर कसबे,एकनाथ बचुटे,बिभीषण गादेकर,भगवंत बचुटे,पिंटू लोंढे,नितीन आरगडे,सदानंद गाडे, विशाल रगडे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button