विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती घालविण्यासाठी गुंड इंग्रजी पॅटर्न महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल – प्राध्यापक विकास गरड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक गुंड लिखित इंग्रजी व्याकरण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी नुकताच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे येथील जेष्ठ अधिव्याख्याता विकास गरड, बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, संस्थेचे सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा पुरस्कृत असली तरी आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या इंग्रजीलाही तितकेच महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी आणि इंग्रजी भाषा आपलीशी करून घेण्यासाठी प्राचार्य दीपक गुंड यांनी लिहिलेले इंग्रजी व्याकरण हे पुस्तक सर्व स्तरातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, येणाऱ्या काळामध्ये गुंड इंग्रजी पॅटर्न महाराष्ट्रामध्ये दिशादर्शक ठरेल असे मत प्राध्यापक विकास गरड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी वाय यादव, सचिव पी. टी. पाटील, अनिल बनसोडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. तर खजिनदार जयकुमार शितोळे यांनी आपल्या चारोळीच्या माध्यमातून दीपक गुंड यांच्या लिखाणाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ. जितेंद्र जळकुटे यांनी करून दिला तर प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रकांत उलभगत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका माधुरी शिंदे यांनी केले तर आभार प्राध्यापक जयद्रथ गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या