पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जिव्हाळा सोशल फाउंडेशन वैराग यांचे भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेञ तपासणी शिबिर संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमीत्त सालाबाद प्रमाणे जिव्हाळा सोशल फाउंडेशन वैराग तर्फे आयोजित रक्तदान शिबीरात ५४ जणांनी रक्तदान केले व अनेक रुग्णांनी नेञ तपासणी करुण घेतली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेची प्रतिष्ठा व मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले .यावेळी माजी सरपंच संतोष निंबाळकर, माजी जि. प . सभापती मकरंद निंबाळकर ,नानासाहेब धायगुडे मेंबर, जि. प .सदस्य श्रीमंत थोरात, वैजिनाथ आदमाने, अरुण सावंत, सुभाष शेळके नगरसेवक श्रीशैल्य भालंशंकर, गोंविद ताटे, बाबा रेड्डी, बजरंग पांढरमिसे, कालिदास देवकते , आकाश भुमकर, प्रशांत भालशंकर, विजय निंबाळकर, दत्ता क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम साठी डाॅ. अमर खेंदाड व सोलापुर येथील मेडिकेअर ब्लड बँक व डाॅ . अरुणा भिसे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिव्हाळ्याचे भारत सोलंनकर , संजय पांढरमिसे, अमर कोळेकर, नवनाथ शिंगाडे, संतोष हजारे, कैलास पांढरमिस, सुधिर महानवर , दादा व्हडगिरे, प्रशांत कोळेकर, दादा सातपुते, भाऊसाहेब पांढरमिसे, नागेश भालशंकर आदिनी परिश्रम घेतले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या