“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम संधी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी e-KYC प्रक्रियेत सुधारणा करण्याची अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र प्रक्रिया पूर्ण करताना “लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे” या संदर्भातील पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांसाठीच ही सुधारणा संधी देण्यात आली आहे.50000सदर महिलांना ऑनलाईन पद्धतीने पुन्हा एकदा e-KYC मध्ये आवश्यक दुरुस्ती करता येणार असून, त्यासाठी दि. ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. संबंधित सुधारणा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाभार्थी महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ३१ मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत e-KYC मध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नसल्याची स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी मुदतीपूर्वीच आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन बाल विकास प्रकल्प कार्यालयाने केले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या