पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी प्रसिद्ध

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, माध्यम, प्रश्नपत्रिका संचकोड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ५ मार्च २०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही. 50000प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in वhttps://mscenmms.in/या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button