जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक बार्शीच्या वतीने किल्ले शिवनेरी वर स्वच्छता मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क
किल्ले शिवनेरी ता.जुन्नर : जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक बार्शीची छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे पर्यटन सहल गेली होती. गडावर फिरत असताना बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, चिप्स पुडे, गुटख्याच्या पुड्या, चप्पल, बुट पडलेले दिसून आले.पथक प्रमुख हर्षद लोहार, प्रविण परदेशी, अविनाश बोकफोडे यांनी वृक्ष संवर्धन समिती, बार्शी कडून प्रेरणा घेऊन सर्व सदस्यांशी चर्चा करून स्वच्छता मोहीम करण्याचे ठरविले.
लागलीच सोबत नेलेल्या पिशव्यांमध्ये कचरा गोळा केला. आणि पायथ्याच्या कचरा कुंडीमध्ये टाकला. हि मोहीम राबवत असताना बर्याच पर्यटकांनी कामाचं कौतुक केलं.
सर्व शिवप्रेमींना विनंती की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गड पवित्र ठिकाण म्हणुन आपण मानतो. तरी गडांवर जाताना सोबत नेलेल्या टाकाऊ वस्तू स्वतः हून कचरा कुंडीत टाकून सहकार्य करावे असे आवाहन जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शीच्या वतीने करण्यात आले.